Posts

Showing posts with the label सामाजिक
Image
  मंडल आयोगाची ३० वर्षं आणि ओबीसींची दशा आणि दिशा ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्राचा हा लेखा जोखा. इंडी जर्नल Aug 08, 2022 7:58 PM Credit : इंडी जर्नल Pay to keep good journalism alive ₹ 10/- ₹ 20/- ₹ 50/- ₹ 100/- Custom राम वाडीभष्मे/कल्याणी राठोड |  ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई’ येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ओबीसी कार्यकर्ते, विविध संघटेनेचे पदाधिकारी व अभ्यासक यांनी उपस्थित केलेल्या समस्या, प्रश्न, मुद्दे व उपाय यावर आधारित हा लेखा जोखा  इतर मागासवर्ग (ओबीसी) यांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली १९७८ साली आयोग नेमण्यात आला होता. आयोगाने संपूर्ण भारतातील, सामाजिक व शैक्षणिक समाजाचा (विविध धर्मातील) अभ्यास करून १९८० मध्ये आपला अहवाल तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्याकडे सुपूर्द केला. मंडल आयोगाने ओबीसींची लोकसंख्या ५२% असावी, असा अंदाज व्यक्त करून ओबीसी प्रवर्गासाठी २७% आरक्षणाची शिफारस केली....

“भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश!

Image
  भीमाच्या लेखण्या ROUND TABLE INDIA- MARATHI ABOUT FEATURES EVENTS AND ACTIVISM CONTACT US “भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश! July 27, 2022   राम वाडीभष्मे   भीमा   1 Share Tweet राम वाडीभष्मे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला. ‘भुरा आत्मकथन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु. येथे ‘फ्रेंच तत्त्वज्ञानाचे’ प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक...

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

Image
सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला.  ' भुरा आत्मकथन ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु . येथे 'फ्रेंच तत्त्वज्ञानाचे' प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अडचणींना कसे सामोरे जावे लागतो, त्यांच्या संघर्ष कसा असतो. या विषयावर चर्चा करत असताना ते बोलले. पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र असो या स्पर्धेच्या युगात  काटकसरीने अभ्यास करून आत्मविश्वासाने नेहमी एक पाऊल समोर राहून जीवनातील प्रत्येक अडचण...

मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

Image
एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्य...

मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

Image
लाल टीशर्ट घातलेले राम फड सर राम फड  हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते  मैत्री या संस्थेत  कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात.  मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे.  राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत.  सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण...

पतीला साथ, उदरनिर्वाहाची नवी पहाट

Image
पंचशीला ताईंचा प्रेरणादायी प्रवास अवंती भोयर /  कल्याणी राठोड /  राम वाडीभष्मे नवऱ्याला पायाचा त्रास असल्याने काम येणाऱ्या अडचणींमुळे, नववी पर्यंत शिकलेल्या पंचशीला या तीन वर्षांपासून व्यवसाय स्वतः चालवत आहेत. त्यांचा हा फळांचा रस विक्रीचा व्यवसाय १० वर्षांपासून सुरू आहे. त्यांना तीन मुली व सासू सासरे असून कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होत आहे.  सुरुवातीला पती रवींद्र हा व्यवसाय करायचे. ते सिकलसेल (एस एस) आजार ग्रस्त असून त्यांना आलेल्या कमजोरीमुळे ते पडले होते, तेव्हा  कमरेजवळ असलेला बॉल घसरला त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही. हा व्यवसाय उभे राहून करावा लागतो तसेच यात कंबर व हाताच्या हालचालींना महत्व असल्याने ते रवींद्रला शक्य नव्हते. म्हणून पंचशीला यांनी या व्यवसायात तीन वर्षाआधी हातभार लावणे सुरू केले व आज पूर्ण व्यवसाय त्या सांभाळत आहेत.  दिवसाला सरासरी पाचशे रुपये त्या कमवतात. आता उन्हाळा सुरू झाल्याने कमाई जास्त होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात घरासमोर ठेला लावला होता व ज्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे तिथे घराच्या पत्त्याची प...

आदिवासी महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणार ; शुभदा देशमुख

Image
जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष मुलाखत अवंती भोयर / राम वाडीभष्मे फोटो शुभदा देशमुख यांच्या एफबीवरुन सादर   गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व मागासलेला असून येथील मोठ्या प्रमाणात असलेला आदिवासी समाज हा सामान्य समाज जीवनाप्रमाणेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. रोजगारापासून ते आरोग्यापर्यंतच्या आदिवासींच्या सर्वच प्रश्नांना हे दाम्पत्य भिडत असून कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी`ही संस्था १९८४ मध्ये स्थापन करून तेव्हापासून शेती, आरोग्य, अपंग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे.   महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हे सुध्दा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केल...

आता हे, या बैठकीतून अमृत बाहेर काढणार काय?

Image
निवडणूक आयोगाने विष ओकले तर आता हे या चिंतन बैठकीतून अमृत काढणार आहेत काय.? आता हे, या बैठकीतून अमृत बाहेर काढणार काय?   स्था स्व संस्थेतील ओबीसी आरक्षणाला घेऊन पहिले 10 मे 2010 व राज्यातील काही जिल्ह्यातील 50% आरक्षण सिमेचे विषय समोर करुन ओबीसी आरक्षण रद्द बाबत 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. तो निर्णय अर्धवट आणि ओबीसींवर अन्यायकरकारक असल्याचे लक्षात घेत, 22 मार्च 2021 ला राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. तर 22 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने त्यासंबधाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा प्रसार माध्यमातून आपले मत प्रगट करत हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आता ओबीसीने काय भूमिका घ्यायला हवी, यावर मत मांडलीत. सोबतच महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटे पर्यंत निवडणुका होऊ नयेत, यासंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर राज्यातील काही पक्ष पुढे येऊन आपली भूमिका ठेवत झेंडा हलवू लागले. त्याच पाठोपाठ काही सामाजिक संघटना सुद्धा यावर बोलू लागल्यात. पुन्हा 27 तारखेला भाजप या पक्षाने रास्ता रोको जाहीर क...