मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

लाल टीशर्ट घातलेले राम फड सर राम फड हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते मैत्री या संस्थेत कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात. मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे. राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत. सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण...