Posts

Showing posts with the label पदवीधर

मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

Image
एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्य...