आता वाढतो आहे, बालकांमध्ये टोमॅटो फ्लूचा धोका

८० पेक्षा अधिक बालकांना बाधा, ५ वर्षाखालील मुलं सर्वाधिक photo : internet देशात आजकाल लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने पसरत आहे. यातच कोरोनामुळे जग संकटात असताना आता नवीन संकट निर्माण झाले आहे. ते म्हणजेच टोमॅटो फ्लू हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. टोमॅटो फ्लूने चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत ८० पेक्षा अधिक बालकांना टोमॅटो फ्लूची लागण झाली आहे. संशयित रुग्णामध्ये ५ वर्षाखालील सर्वाधिक मुलं आहेत. या फ्लूने बाधित मुलांच्या शरीरावर फोड तयार होतात जे खूप वेदनादायक असतात. या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात पहिली नोंद द लॅन्सेट रेस्पिरेटरी वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ६ मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि २६ जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या ८२ वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची ...