मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

लाल टीशर्ट घातलेले राम फड सर
राम फड हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते मैत्री या संस्थेत कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात. 

मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे. 

राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत. 

सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत
झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण्यास त्यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आज त्यांच्या हाताखाली मैत्री संस्थेत ३० ते ३५ व्यक्ती काम करत असतात. तर देश विदेशातील विद्यार्थी तसेच अभ्यासक त्यांच्या मदतीने या भागातील अभ्यास करत असतात. 

सरांबद्दल खूप काही लिहण्यासारखं आहे पण तूर्तास एवढंच..

धन्यवाद सर.. तुम्हाला भेटून छान वाटलं अशा व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा खुल काही याभागाचा अभ्यास करता येईल..

Comments

Popular posts from this blog

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था