Posts

Showing posts with the label भौगोलिक

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

Image
तब्बल दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळ ही इथेच आहे. ह्या मेळघाट मागे एक वास्तव लपलेलं आहे. ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. येथील नागरिकांना कोसोदूर डोंगर दऱ्यातुन चढाव उतार करून पायपीट करत तसेच दूरवरच्या गावातून मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागते. शासना कडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो ही तोंडाला पाने पुसल्या सारखाच. गावातील नागरिकांना दिवसरात्र एकच चिंता असते ती म्हणजे मुबलक व शुद्ध पिण्याजोगे पाणी कुठे मिळणार? टँकरने मिळणारे पाणी, लोकांचे आपसात भांडण होऊ नये म्हणून, विहरीत सोडले जाते. तो ही गढूळ असल्याने रोगराईला आमंत्रणच. कावीळ, हगवण, ताप, अंगदुखी, पोटदुखी इत्यादी रोगांचा सामना येथील नागरिक करत असतात....

अखेर १८५७ नंतर वऱ्हाडत गुरे आयात करावी लागली -कापूसकोंड्याची गोष्ट

Image
१८५७ च्या युद्धात उत्तरप्रदेश भागात वऱ्हाडतील ताकदवान व काटक अशा जातीचे बैल नेलं जात असत. ज्यात खामगाव व उमरडा ही महत्वाची जात मानली जायची. मात्र नंतर आलेल्या गुरांच्या रोगांमुळे लाखांच्या संख्येत वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) गुरे मेल्यानंतर बाहेरून गुरे आयात करावी लागली.  कापूसकोंड्याची गोष्ट लेखक डॉ. लक्ष्मण सत्या, अनुवादक नंदा खरे.. या पुस्तकात ब्रिटिश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे.  या पुस्तकाला ऍड. श्रीहरी अणे यांनी प्रस्तावना दिली आहे.  यात पश्चिम विदर्भातील भौगोलिक परिस्थिती, भूजल पातळी, शेती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यासंबंधाने लिखाण केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की वऱ्हाडात सुद्धा मिठाचा उत्पन्न होत असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. तसेच नदी, उपनदी व नदी खोऱ्याच्या संबंधाने व त्यांचे पाण्यासंबंधाने महत्व याबद्दल सुद्धा लिखाण झाले आहे.  लेखकाने विशेष भर दिला आहे तो पशुधन संबंधाने त्यावेळी किती पशुधन होते त्यांची वर्षनिहाय आकडेवारी तर ब्रिटिश शासनाच्या कायद्यामुळे ...