मेळघाटात घडत आहेत एकलव्य

एकलव्य फाउंडेशनच्या मदतीने मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला, सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका म्हणजेच मेळघाट. हा भाग बालमृत्यू, कुपोषणसाठी तर प्रसिद्ध आहेच सोबतच शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे? असे म्हणता येईल. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू व इतर आदिवासी समाज आहे. हा समाज अतिशय दुर्गम व जंगल भागात राहत असून या समाजातील आजही युवक युवती शिक्षणापासून वंचित आहेत. याकरिता एकलव्य फाउंडेशन गेल्या ४ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही, म्हणून एकलव्य पुढे आले.. १० वर्षा आधी याभागात काम करत असताना एकलव्यचे संस्थापक राजू केंद्रे यांना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी, लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मत...