Posts

Showing posts from June, 2022

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

Image
तब्बल दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळ ही इथेच आहे. ह्या मेळघाट मागे एक वास्तव लपलेलं आहे. ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. येथील नागरिकांना कोसोदूर डोंगर दऱ्यातुन चढाव उतार करून पायपीट करत तसेच दूरवरच्या गावातून मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागते. शासना कडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो ही तोंडाला पाने पुसल्या सारखाच. गावातील नागरिकांना दिवसरात्र एकच चिंता असते ती म्हणजे मुबलक व शुद्ध पिण्याजोगे पाणी कुठे मिळणार? टँकरने मिळणारे पाणी, लोकांचे आपसात भांडण होऊ नये म्हणून, विहरीत सोडले जाते. तो ही गढूळ असल्याने रोगराईला आमंत्रणच. कावीळ, हगवण, ताप, अंगदुखी, पोटदुखी इत्यादी रोगांचा सामना येथील नागरिक करत असतात.

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

Image
एकलव्य फाउंडेशनच्या मदतीने     मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला, सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका म्हणजेच मेळघाट. हा भाग बालमृत्यू, कुपोषणसाठी तर प्रसिद्ध आहेच सोबतच शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे? असे म्हणता येईल. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू व इतर आदिवासी समाज आहे. हा समाज अतिशय दुर्गम व जंगल भागात राहत असून या समाजातील आजही युवक युवती शिक्षणापासून वंचित आहेत. याकरिता एकलव्य फाउंडेशन गेल्या ४ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही, म्हणून एकलव्य पुढे आले.. १० वर्षा आधी याभागात काम करत असताना एकलव्यचे संस्थापक राजू केंद्रे यांना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी, लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मताला घेऊन,