Posts

Showing posts with the label मंडल आयोग
Image
  मंडल आयोगाची ३० वर्षं आणि ओबीसींची दशा आणि दिशा ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्राचा हा लेखा जोखा. इंडी जर्नल Aug 08, 2022 7:58 PM Credit : इंडी जर्नल Pay to keep good journalism alive ₹ 10/- ₹ 20/- ₹ 50/- ₹ 100/- Custom राम वाडीभष्मे/कल्याणी राठोड |  ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई’ येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ओबीसी कार्यकर्ते, विविध संघटेनेचे पदाधिकारी व अभ्यासक यांनी उपस्थित केलेल्या समस्या, प्रश्न, मुद्दे व उपाय यावर आधारित हा लेखा जोखा  इतर मागासवर्ग (ओबीसी) यांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली १९७८ साली आयोग नेमण्यात आला होता. आयोगाने संपूर्ण भारतातील, सामाजिक व शैक्षणिक समाजाचा (विविध धर्मातील) अभ्यास करून १९८० मध्ये आपला अहवाल तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्याकडे सुपूर्द केला. मंडल आयोगाने ओबीसींची लोकसंख्या ५२% असावी, असा अंदाज व्यक्त करून ओबीसी प्रवर्गासाठी २७% आरक्षणाची शिफारस केली....