'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाला विरोध का?

आमिर खान ' लाल सिंह चड्ढा ' या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा येत आहे. तो शेवटी ' ठग्स ऑफ हिंदोस्तान ' मध्ये दिसला होता , ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत काम केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा १९९४ सालच्या अमेरिकन ड्रामा फिल्म ‘फॉरेस्ट गम्प’ चा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खान सरदार आणि करीना त्याची सरदारनी ची भूमिका साकारत आहेत . साऊथ स्टार नागा चैतन्यही ' लाल सिंग चड्ढा ' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. परंतु ' लाल सिंह चड्ढा ' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला काही संघटनांकडून देशभरात विरोध होत आहे. नेमका प्रकरण काय आहे ? आमिर खानला विरोध करणारे सध्या आमिर खानची काही जुनी विधाने सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. भारतातील वाढत्या असहिष्णुतेमुळे त्याची पत्नी आपल्या देशात राहण्यास घाबरते , असे विधान आमिर खानने एकदा केले होते. या मुद्द्यावर काही लोक आमिर खानला देशद्रोही म्हणत आहेत आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवा...