'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाला विरोध का?

आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा येत आहे. तो शेवटी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत काम केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.



अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा १९९४ सालच्या अमेरिकन ड्रामा फिल्म ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक आहे.  या चित्रपटात आमिर खान सरदार आणि करीना त्याची सरदारनीची भूमिका साकारत आहेत.  साऊथ स्टार नागा चैतन्यही 'लाल सिंग चड्ढा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. परंतु 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला काही संघटनांकडून देशभरात विरोध होत आहे.

नेमका प्रकरण काय आहे?

आमिर खानला विरोध करणारे सध्या आमिर खानची काही जुनी विधाने सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.  भारतातील वाढत्या असहिष्णुतेमुळे त्याची पत्नी आपल्या देशात राहण्यास घाबरते, असे विधान आमिर खानने एकदा केले होते.  या मुद्द्यावर काही लोक आमिर खानला देशद्रोही म्हणत आहेत आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत.  याशिवाय काही लोक आमिर खानवर तो हिंदूविरोधी असल्याचा आरोपही करत आहेत.  हे लोक आमिर खानच्या 'पीके' चित्रपटातील काही दृश्यांसह ट्विट करत आहेत आणि त्याला हिंदू धर्माचा अपमान म्हणत आहेत.  येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे विरोध करणारे हे लोक एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे असल्याचे दिसून येत आहे.

देशात वेगवेगळ्या ठिकाणी विरोध प्रदर्शन

हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशातील काही शहरात याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला असून चित्रपट बॉयकॉट करण्याची धमकी दिली जात आहे. दिल्ली, जालंधर येथील एमबीडी मॉल समोर शिवसेना हिंद आणि सिख तालमेल समितीचे सदस्य अमोरा समोर आले होते. वाराणसी येथे ‘सनातन रक्षक सेना’च्या सदस्यांनी गुरुवारी विजया मॉल समोर येऊन विरोध प्रदर्शन केला. सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना या चित्रपटावर बंदी आणण्याचे मागणी ‘सनातन रक्षक सेना’ प्रदेश अध्यक्ष यांनी केली आहे.

पंजाबमध्ये हिंदू-शीख अमोरा समोर

हिंदू देव-देवतांचा अपमान केल्यावरून पंजाब मध्ये हिंदू संघटनांनी अमीर खान व त्यांच्या चित्रपटाचा विरोध सुरू केला. तर शीख संघटना अमीर खानच्या बाजूने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. शीख संघटनांचे म्हणणे आहे की, हे चित्रपट एका शिख पत्रावर आधारित आहे. त्यामुळे विरोध करण्याचा अधिकार हिंदू संघटनांना नाही. सोबतच कोणतेही खेळ थांबवण्याची गरज नाही, हा चित्रपट कोण थांबवतो, हे पाहू असे आव्हानही त्यांनी या वेळी केला.

भारतीय सैन्यसशस्त्र बल आणि शिखांचा अपमान

इंग्लिश क्रिकेटपटू मॉन्टी पनेसरच मत आहे की, या चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शिखांचा अपमान करण्यात आला आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी त्यांनी टि्वट करुन केली आहे.

“फॉरेस्ट गंप’ अमेरिकन सैन्यासाठी योग्य आहे. कारण अमेरिकेने व्हिएतनाम युद्धासाठी कमी आयक्यू असलेल्या पुरुषांची भर्ती केली होती. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने भारतीय सैन्य, सशस्त्र बल आणि शिखांचा अपमान केला आहे” असं पनेसरने आपल्या टि्वट मध्ये म्हटलय.


‘फॉरेस्ट गम्प’ची ६७ कोटी डॉलर्सची कमाई

हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ १९९४ मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने ६७ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. टॉम हॉक्सचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा हा चित्रपट किती कमाई करतो, त्याची उत्सुक्ता आहे.

अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत 'रक्षाबंधन'ला टाकले मागे

'लाल सिंह चड्ढा'ने अॅडव्हान्स बुकिंगपासून ५ दिवसांत १२ कोटींचा व्यवसाय केला त्याचबरोबर 'रक्षाबंधन'ने ५ दिवसांत केवळ ५ कोटींची कमाई केली आहे.  'लाल सिंह चड्ढा'ची ५७,००० आणि 'रक्षा बंधन'ची ३५,००० तिकिटे पहिल्या दिवशी विकली गेली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगाऊ बुकिंगमध्ये, 'लाल सिंग चड्ढा' ने PVR, INOX आणि Cinépolis या तीन प्रमुख थिएटरमध्ये बुधवारी सकाळपर्यंत सुमारे ३०,००० तिकिटांची विक्री केली.  दुसरीकडे, पॅन इंडियाच्या तिकीट विक्रीच्या बाबतीत, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत सुमारे ५७,००० तिकिटांची विक्री झाली आहे.  अशा परिस्थितीत 'लाल सिंग चड्ढा'चे बुकिंग देशभरात सुमारे १.१० लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. 

‘लाल सिंह चड्ढा’चे बजेट किती?

लाल सिंह चड्ढाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे बजेट जवळपास १८० कोटी आहे.  हा चित्रपट देशभरातील जवळपास ३५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.  अशा परिस्थितीत पहिल्याच दिवशी हा चित्रपट १५ ते १७ कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.  असे झाले तरच हा चित्रपट अक्षय कुमारच्या रक्षाबंधनाला मागे टाकू शकतो, अन्यथा आमिर खानसाठी मोठी अडचण होणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?