Posts

Showing posts from August, 2022

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?

Image
  विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय? केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ योजनेबाबत २४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक प्रसृत केले आहे. Written by  दत्ता जाधव August 29, 2022 1:33:03 am Click to share on Twitter (Opens in new window) Click to share on Facebook (Opens in new window) Click to share on WhatsApp (Opens in new window) (संग्रहित छायाचित्र) दत्ता जाधव केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ धोरण देशात लागू केले आहे. या धोरणांनुसार पंतप्रधान भारतीय जन खत योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. या धोरणावर देशभरातून टीकेचा सूर उमटू लागला आहे त्याबाबत. काय आहे  ‘ एक देश एक खत ’  योजना ? केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ योजनेबाबत २४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक प्रसृत केले आहे. त्यानुसार देशात २ ऑक्टोबर २०२२ पासून म्हणजे गांधी जयंतीपासून देशात विकली जाणारी सर्व अनुदानित रासायनिक खते ‘एक देश एक खत’ या योजनेअंतर्गत विकली जाणार आहेत. सर्व खत विक्रेत्या कंपन्यांना एकसारखेच वेष्टन आणि वेष्टनावरील मजकूर छापावा लागणार आहे. खताच्या वेष्टनावरील ७५ टक्के भागावर

सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

Image
  सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. Written by  लोकसत्ता टीम August 25, 2022 2:38:57 am Click to share on Twitter (Opens in new window) Click to share on Facebook (Opens in new window) Click to share on WhatsApp (Opens in new window) (संग्रहित छायाचित्र) नागपूर   : मुंबईतील विधानभवन परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांची विवंचना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध विदर्भाची आकडेवारी राज्यकर्त्यांच्या डोळय़ात अंजन घालणारी आहे. गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. या काळात एकटय़ा अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटाच्या मालिकेत विदर्भातील शेतकरी सापडले आहेत. वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी हताश झाले असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर होत आहेत. मात

आता वाढतो आहे, बालकांमध्ये टोमॅटो फ्लूचा धोका

Image
८० पेक्षा अधिक बालकांना बाधा, ५ वर्षाखालील मुलं सर्वाधिक photo : internet देशात आजकाल लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने पसरत आहे. यातच कोरोनामुळे जग संकटात असताना आता नवीन संकट निर्माण झाले आहे. ते म्हणजेच टोमॅटो फ्लू हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. टोमॅटो फ्लूने चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत ८०  पेक्षा अधिक बालकांना टोमॅटो फ्लूची लागण झाली आहे. संशयित रुग्णामध्ये ५ वर्षाखालील सर्वाधिक मुलं आहेत. या फ्लूने बाधित मुलांच्या शरीरावर फोड तयार होतात जे खूप वेदनादायक असतात. या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात पहिली नोंद द लॅन्सेट रेस्पिरेटरी वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ६ मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि २६ जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या ८२ वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची लागण

'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाला विरोध का?

Image
आमिर खान ' लाल सिंह चड्ढा ' या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा येत आहे. तो शेवटी ' ठग्स ऑफ हिंदोस्तान ' मध्ये दिसला होता , ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत काम केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा १९९४ सालच्या अमेरिकन ड्रामा फिल्म ‘फॉरेस्ट गम्प’ चा रिमेक आहे.   या चित्रपटात आमिर खान सरदार आणि करीना त्याची सरदारनी ची भूमिका साकारत आहेत .   साऊथ स्टार नागा चैतन्यही ' लाल सिंग चड्ढा ' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. परंतु ' लाल सिंह चड्ढा ' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला काही संघटनांकडून देशभरात विरोध होत आहे. नेमका प्रकरण काय आहे ? आमिर खानला विरोध करणारे सध्या आमिर खानची काही जुनी विधाने सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.   भारतातील वाढत्या असहिष्णुतेमुळे त्याची पत्नी आपल्या देशात राहण्यास घाबरते , असे विधान आमिर खानने एकदा केले होते.   या मुद्द्यावर काही लोक आमिर खानला देशद्रोही म्हणत आहेत आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवा

तिरंगा लाल किल्ल्यावरच का फडकवला जातो?

Image
स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला जातो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाच्या नावाने संबोधित करत असतात. मात्र, स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याची निवड का करण्यात आली? हा साधा प्रश्न अनेकदा प्रत्येकाच्या मनात घर करत असणार. याचे कोणतेही नेमके कारण किंवा लिखित दस्तऐवज नाही. परंतु असे अनेक कारणे आहेत. ज्यामुळे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची परंपरा सुरू झाली. देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाचे केंद्रस्थान लाल किल्ला कसा बनला ते जाणून घेऊया... Photo Credit : Wallpaper Safari पाचवा मुघल बादशहा शाहजहांने बांधला लाल किल्ला १६३८ ते १६४९ या काळात मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. दिल्लीस्थित लाल किल्ला केवळ भारतीय अस्मितेचे प्रतीक नाही, तर इतिहासातील बऱ्याच घटनांचा तो साक्षीदारही आहे. लाल संगमरवरी दगडावरून लाल किल्ला नाव पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला असून, दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला, लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता.  मुख्य लक्ष्य लाल किल्ला सत