बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो!
बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो! बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवताना कृषी सहाय्यक यावर्षीच्या खरीप पीक हंगामाला सुरुवात झालेली आहे. तालुक्यात खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणून धान, कापूस, मिरची हे पीक घेतल्या जातो. परंतु दरवर्षी करपा,कडा करपा,मर रोग, काजळी यासारख्या बुरशीजन्य रोगांमुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पन्ना मध्ये घट येते यावर उपाय म्हणून बिजप्रक्रिया करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे पिकाला संरक्षित करता येते, तर रोगावरील खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे पिकामध्ये भविष्यात येणाऱ्या रोगापासून आपल्या पिकाला संरक्षीत करण्याकरिता तसेच रोगावरील खर्च कमी करण्याकरिता सर्वांनी बुरशीनाशकांची तसेच जिवाणू खताची बीजप्रक्रिया करूनच बियाणे वापरावे. असे आव्हान सुद्धा कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी” अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे. तसेच ते ...