बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो!

बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो! 

बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवताना कृषी सहाय्यक 
 

    यावर्षीच्या खरीप पीक हंगामाला सुरुवात झालेली आहे. तालुक्यात खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणून धान, कापूस, मिरची हे पीक घेतल्या जातो. परंतु दरवर्षी करपा,कडा करपा,मर रोग, काजळी यासारख्या बुरशीजन्य रोगांमुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पन्ना मध्ये घट येते यावर उपाय म्हणून बिजप्रक्रिया करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे पिकाला संरक्षित करता येते, तर  रोगावरील खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे पिकामध्ये भविष्यात येणाऱ्या रोगापासून आपल्या पिकाला संरक्षीत करण्याकरिता तसेच रोगावरील खर्च कमी करण्याकरिता सर्वांनी बुरशीनाशकांची तसेच जिवाणू खताची बीजप्रक्रिया करूनच बियाणे वापरावे. असे आव्हान सुद्धा कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

“शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी” 

    अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे. तसेच ते दर तीन वर्षांनी बदलाने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. अधिक माहिती करिता नजीकच्या सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. 

बिजप्रक्रियेची तीन पद्धत 

    1) ३ टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया : बादलीमध्ये १० लिटर पाणी घ्यावे, १० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्राम मीठ टाकावे व द्रावण काठीने ढवळून विरघळून घ्यावे, द्रावणात बियाणे ओतावे व काठीने ढवळून घ्यावे, द्रावण स्थिर होऊ द्यावे, पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगदवरचे वर काढून नष्ट करून घ्यावे, तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे द्रावणा बाहेर काढून २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे, सदर बियाणे सावलीत ताडपत्रीवर २४ तास वाळवावे.

    2) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया : २४ तासानंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून थायरम कार्बेन्डॅझिम (बाविस्टीन) हे बुरशी नाशक २.५ ग्राम प्रती किलोग्राम या प्रमाणे बियाण्यास पेरणी पूर्वी चोळावे. 

    3) जीवाणू खताची बीजप्रक्रिया लिक्विड कान्सोर्सिया : PSB( स्फुरद विरघळविणारे जीवाणू),वापरायचे प्रमाण २५० ग्राम / १० किलोग्राम बियाणे, अझेटोबेक्टर (नत्र स्थिर करणारे जीवाणू) वापरायचे प्रमाण २०० ग्राम / १० किलोग्राम बियाणे.

बिजप्रक्रियेचे फायदे 

    बि मध्ये, बियाण्यावर तसेच जमिनीत राहणाऱ्या बुरशीचा नाश करता येतो, जमिनीतून व बियाण्यानद्वारे पसारणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यामदत होतो, पिकांचे उत्पादन वाढ करण्यास मदत होते तर लिक्विड कान्सुर्सियाची बीज प्रक्रिया केल्याने खताची बचत होते.

    कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत बीजप्रक्रिया राबवित असताना तालुका कृषि अधिकारी संदीप नाकाडे, कृषि सहाय्यक ज्ञानेश्वर वाळके यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?