Posts

Showing posts from March, 2022

पतीला साथ, उदरनिर्वाहाची नवी पहाट

Image
पंचशीला ताईंचा प्रेरणादायी प्रवास अवंती भोयर /  कल्याणी राठोड /  राम वाडीभष्मे नवऱ्याला पायाचा त्रास असल्याने काम येणाऱ्या अडचणींमुळे, नववी पर्यंत शिकलेल्या पंचशीला या तीन वर्षांपासून व्यवसाय स्वतः चालवत आहेत. त्यांचा हा फळांचा रस विक्रीचा व्यवसाय १० वर्षांपासून सुरू आहे. त्यांना तीन मुली व सासू सासरे असून कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होत आहे.  सुरुवातीला पती रवींद्र हा व्यवसाय करायचे. ते सिकलसेल (एस एस) आजार ग्रस्त असून त्यांना आलेल्या कमजोरीमुळे ते पडले होते, तेव्हा  कमरेजवळ असलेला बॉल घसरला त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही. हा व्यवसाय उभे राहून करावा लागतो तसेच यात कंबर व हाताच्या हालचालींना महत्व असल्याने ते रवींद्रला शक्य नव्हते. म्हणून पंचशीला यांनी या व्यवसायात तीन वर्षाआधी हातभार लावणे सुरू केले व आज पूर्ण व्यवसाय त्या सांभाळत आहेत.  दिवसाला सरासरी पाचशे रुपये त्या कमवतात. आता उन्हाळा सुरू झाल्याने कमाई जास्त होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात घरासमोर ठेला लावला होता व ज्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे तिथे घराच्या पत्त्याची पाटी व फोन नंबर दिला होता

आदिवासी महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणार ; शुभदा देशमुख

Image
जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष मुलाखत अवंती भोयर / राम वाडीभष्मे फोटो शुभदा देशमुख यांच्या एफबीवरुन सादर   गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व मागासलेला असून येथील मोठ्या प्रमाणात असलेला आदिवासी समाज हा सामान्य समाज जीवनाप्रमाणेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. रोजगारापासून ते आरोग्यापर्यंतच्या आदिवासींच्या सर्वच प्रश्नांना हे दाम्पत्य भिडत असून कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी`ही संस्था १९८४ मध्ये स्थापन करून तेव्हापासून शेती, आरोग्य, अपंग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे.   महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हे सुध्दा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सत