Posts

Showing posts with the label महिला

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

Image
तब्बल दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळ ही इथेच आहे. ह्या मेळघाट मागे एक वास्तव लपलेलं आहे. ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. येथील नागरिकांना कोसोदूर डोंगर दऱ्यातुन चढाव उतार करून पायपीट करत तसेच दूरवरच्या गावातून मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागते. शासना कडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो ही तोंडाला पाने पुसल्या सारखाच. गावातील नागरिकांना दिवसरात्र एकच चिंता असते ती म्हणजे मुबलक व शुद्ध पिण्याजोगे पाणी कुठे मिळणार? टँकरने मिळणारे पाणी, लोकांचे आपसात भांडण होऊ नये म्हणून, विहरीत सोडले जाते. तो ही गढूळ असल्याने रोगराईला आमंत्रणच. कावीळ, हगवण, ताप, अंगदुखी, पोटदुखी इत्यादी रोगांचा सामना येथील नागरिक करत असतात....

मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

Image
लाल टीशर्ट घातलेले राम फड सर राम फड  हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते  मैत्री या संस्थेत  कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात.  मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे.  राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत.  सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण...

पतीला साथ, उदरनिर्वाहाची नवी पहाट

Image
पंचशीला ताईंचा प्रेरणादायी प्रवास अवंती भोयर /  कल्याणी राठोड /  राम वाडीभष्मे नवऱ्याला पायाचा त्रास असल्याने काम येणाऱ्या अडचणींमुळे, नववी पर्यंत शिकलेल्या पंचशीला या तीन वर्षांपासून व्यवसाय स्वतः चालवत आहेत. त्यांचा हा फळांचा रस विक्रीचा व्यवसाय १० वर्षांपासून सुरू आहे. त्यांना तीन मुली व सासू सासरे असून कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होत आहे.  सुरुवातीला पती रवींद्र हा व्यवसाय करायचे. ते सिकलसेल (एस एस) आजार ग्रस्त असून त्यांना आलेल्या कमजोरीमुळे ते पडले होते, तेव्हा  कमरेजवळ असलेला बॉल घसरला त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही. हा व्यवसाय उभे राहून करावा लागतो तसेच यात कंबर व हाताच्या हालचालींना महत्व असल्याने ते रवींद्रला शक्य नव्हते. म्हणून पंचशीला यांनी या व्यवसायात तीन वर्षाआधी हातभार लावणे सुरू केले व आज पूर्ण व्यवसाय त्या सांभाळत आहेत.  दिवसाला सरासरी पाचशे रुपये त्या कमवतात. आता उन्हाळा सुरू झाल्याने कमाई जास्त होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात घरासमोर ठेला लावला होता व ज्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे तिथे घराच्या पत्त्याची प...

आदिवासी महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणार ; शुभदा देशमुख

Image
जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष मुलाखत अवंती भोयर / राम वाडीभष्मे फोटो शुभदा देशमुख यांच्या एफबीवरुन सादर   गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व मागासलेला असून येथील मोठ्या प्रमाणात असलेला आदिवासी समाज हा सामान्य समाज जीवनाप्रमाणेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. रोजगारापासून ते आरोग्यापर्यंतच्या आदिवासींच्या सर्वच प्रश्नांना हे दाम्पत्य भिडत असून कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी`ही संस्था १९८४ मध्ये स्थापन करून तेव्हापासून शेती, आरोग्य, अपंग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे.   महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हे सुध्दा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केल...