Posts

Showing posts from May, 2022

अखेर १८५७ नंतर वऱ्हाडत गुरे आयात करावी लागली -कापूसकोंड्याची गोष्ट

Image
१८५७ च्या युद्धात उत्तरप्रदेश भागात वऱ्हाडतील ताकदवान व काटक अशा जातीचे बैल नेलं जात असत. ज्यात खामगाव व उमरडा ही महत्वाची जात मानली जायची. मात्र नंतर आलेल्या गुरांच्या रोगांमुळे लाखांच्या संख्येत वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) गुरे मेल्यानंतर बाहेरून गुरे आयात करावी लागली.  कापूसकोंड्याची गोष्ट लेखक डॉ. लक्ष्मण सत्या, अनुवादक नंदा खरे.. या पुस्तकात ब्रिटिश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे.  या पुस्तकाला ऍड. श्रीहरी अणे यांनी प्रस्तावना दिली आहे.  यात पश्चिम विदर्भातील भौगोलिक परिस्थिती, भूजल पातळी, शेती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यासंबंधाने लिखाण केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की वऱ्हाडात सुद्धा मिठाचा उत्पन्न होत असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. तसेच नदी, उपनदी व नदी खोऱ्याच्या संबंधाने व त्यांचे पाण्यासंबंधाने महत्व याबद्दल सुद्धा लिखाण झाले आहे.  लेखकाने विशेष भर दिला आहे तो पशुधन संबंधाने त्यावेळी किती पशुधन होते त्यांची वर्षनिहाय आकडेवारी तर ब्रिटिश शासनाच्या कायद्यामुळे पशुपालकांवर आलेले स

मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

Image
एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्यासाठी काम

राणीगावाला पाणीटंचाईची चिंता

Image
जानेवारी पासूनच पाणीटंचाईला होतो सुरुवात   कल्याणी राठोड / राम वाडीभष्मे : पश्चिम मेळघाटातील धारणी येथून ३५ किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्याच्या शेवटीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. तर उन्हाळ्यात येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. या गावी दोन विहीर असून विहिरीला कसे म्हणून पाणी राहत नाही. इथे नागपूर, अमरावती व पुणे येथील भूवैज्ञानिक बोलावून पाणी पातळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुद्धा निषफल निघाला. ७ वर्षाआधी ११ किमी अंतरावरील गोलाई या गावातून पाणी व्यवस्था करण्यात आली होती. आता ३ ते ४ किमी अंतरावरील कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास २१०० आहे.  या गावातील नागरिक मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक विहिरीच्या फेऱ्या मारत असतात. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदल्या गेल्या पण त्या सुद्धा कोरड्याच निघाल्यात. गावात नळयोजना तर आहे पण पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही उपयोग झाल

मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

Image
लाल टीशर्ट घातलेले राम फड सर राम फड  हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते  मैत्री या संस्थेत  कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात.  मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे.  राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत.  सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण्यास त्यांनी महत्वाचे पाऊल उच