अखेर १८५७ नंतर वऱ्हाडत गुरे आयात करावी लागली -कापूसकोंड्याची गोष्ट

१८५७ च्या युद्धात उत्तरप्रदेश भागात वऱ्हाडतील ताकदवान व काटक अशा जातीचे बैल नेलं जात असत. ज्यात खामगाव व उमरडा ही महत्वाची जात मानली जायची. मात्र नंतर आलेल्या गुरांच्या रोगांमुळे लाखांच्या संख्येत वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) गुरे मेल्यानंतर बाहेरून गुरे आयात करावी लागली. 

कापूसकोंड्याची गोष्ट लेखक डॉ. लक्ष्मण सत्या, अनुवादक नंदा खरे..

या पुस्तकात ब्रिटिश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे. 

या पुस्तकाला ऍड. श्रीहरी अणे यांनी प्रस्तावना दिली आहे. 

यात पश्चिम विदर्भातील भौगोलिक परिस्थिती, भूजल पातळी, शेती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यासंबंधाने लिखाण केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की वऱ्हाडात सुद्धा मिठाचा उत्पन्न होत असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. तसेच नदी, उपनदी व नदी खोऱ्याच्या संबंधाने व त्यांचे पाण्यासंबंधाने महत्व याबद्दल सुद्धा लिखाण झाले आहे. 

लेखकाने विशेष भर दिला आहे तो पशुधन संबंधाने त्यावेळी किती पशुधन होते त्यांची वर्षनिहाय आकडेवारी तर ब्रिटिश शासनाच्या कायद्यामुळे पशुपालकांवर आलेले संकट यात झालेली हानी तसेच चराईवर लावण्यात येत असलेला कर अशा संपूर्ण अंगाने लेखकाने लिखाण केल आहे. 

अत्यंत महत्वाचे म्हणजे कापूस पीक व व्यापार या संबंधाने महत्वाचे लिखाण या वाचायला मिळणार आहे. वसाहत काळात त्यांनी कसे या भागातील असलेले पीक नष्ट करत या भागातील शेतकऱ्यांना कापूस पिकाकडे वळवले. त्यातच या भागातील पाणी व्यवस्थापन आधी कसे होते व नंतर काय बद्दल झालेत.? ब्रिटिश सरकारने याकडे लक्ष दिले की नाही. त्यात नेमके पिकाच्या अनुषंगाने काय बद्दल व्हायला हवे होते. याबद्दल सुद्धा त्यांनी लिखाण केले आहे.

त्यांनी दुष्काळ, रोगराई आणि पशूंचे मृत्यू व त्यावरील उपाय हे शेवटच्या दोन प्रकरणात दिले आहे. तत्कालीन लोक करत असलेले रोगावरील घरगुती उपाय काय व किती गुणकारी होते. तसेच ब्रिटिश सरकारने यात बद्दल.? केले की नाही यासंबंधाने व आरोग्य व्यवस्था किती सक्षम.? होती याबाबत सुद्धा खोलवर लिखाण जेल आहे. 

यात महत्वाचे म्हणजे त्यांनी आकडेवारी सोबतच गॅझेट व तत्कालीन अहवाल तसेच महत्वाच्या अधिकारी, आयुक्त तज्ज्ञ यांची मते सुद्धा यात दिली आहेत. 

पश्चिम विदर्भाच्या भौगोलीक, शेतीच्या अभ्यास समजून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे. 

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?