राणीगावाला पाणीटंचाईची चिंता

जानेवारी पासूनच पाणीटंचाईला होतो सुरुवात कल्याणी राठोड / राम वाडीभष्मे : पश्चिम मेळघाटातील धारणी येथून ३५ किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्याच्या शेवटीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. तर उन्हाळ्यात येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. या गावी दोन विहीर असून विहिरीला कसे म्हणून पाणी राहत नाही. इथे नागपूर, अमरावती व पुणे येथील भूवैज्ञानिक बोलावून पाणी पातळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुद्धा निषफल निघाला. ७ वर्षाआधी ११ किमी अंतरावरील गोलाई या गावातून पाणी व्यवस्था करण्यात आली होती. आता ३ ते ४ किमी अंतरावरील कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास २१०० आहे. या गावातील नागरिक मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक विहिरीच्या फेऱ्या मारत असतात. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदल्या गेल्या पण त्या सुद्धा कोरड्याच निघाल्यात. गावात नळयोजना तर आहे पण पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही ...