राणीगावाला पाणीटंचाईची चिंता

जानेवारी पासूनच पाणीटंचाईला होतो सुरुवात

 कल्याणी राठोड/राम वाडीभष्मे: पश्चिम मेळघाटातील धारणी येथून ३५ किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्याच्या शेवटीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. तर उन्हाळ्यात येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. या गावी दोन विहीर असून विहिरीला कसे म्हणून पाणी राहत नाही.

इथे नागपूर, अमरावती व पुणे येथील भूवैज्ञानिक बोलावून पाणी पातळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुद्धा निषफल निघाला. ७ वर्षाआधी ११ किमी अंतरावरील गोलाई या गावातून पाणी व्यवस्था करण्यात आली होती. आता ३ ते ४ किमी अंतरावरील कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास २१०० आहे. 


या गावातील नागरिक मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक विहिरीच्या फेऱ्या मारत असतात. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदल्या गेल्या पण त्या सुद्धा कोरड्याच निघाल्यात. गावात नळयोजना तर आहे पण पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही उपयोग झाले नसल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. 

पाऊस पडल्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवट पर्यंत पाणी पुरवठा होत असतो. शेतातील विहिरी तसेच बोरवेलला पाणी राहत नसल्याने येथील शेतकरी पिकांकरिता गावातील विहिरीच्या माध्यमातून पाणी देत असल्याने नंतर पाणी टंचाई निर्माण होत असतो. मागील वर्षी कसेबसे नळ योजनेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते असे परंतु आता सरपंच बद्दलल्याने यावर्षी पाण्याची वणवण असल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. विहिरीत असलेल्या डबक्यातून मिळेल ते पाणी घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी वापरले जात असल्याचे ही यावेळी विहिरीवरील पाणी भरणाऱ्या महिलांनी सांगितले.

राणीगाव हे उंच डोंगरावर असल्याने तसेच येथील रस्ता घाटाचा असल्याने बाहेरुन पाणी हे टँकरच्या साहाय्याने पुरवले जाऊ शकत नाही. साधारणपणे ४ किमी घाटाचा रस्ता डोंगरावर चढावा लागतो. यागावातील ही मुख्य समस्या असल्याने येथील नागरिक, शेतकरी तसेच पशुपालक नेहमी चिंतेत असतात. येथे शिक्षणाची व्यवस्था १२ वी पर्यंत असून जिप तसेच निवासी आश्रमशाळा सुद्धा आहे.

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?