Posts

Showing posts with the label शेती

सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

Image
  सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. Written by  लोकसत्ता टीम August 25, 2022 2:38:57 am Click to share on Twitter (Opens in new window) Click to share on Facebook (Opens in new window) Click to share on WhatsApp (Opens in new window) (संग्रहित छायाचित्र) नागपूर   : मुंबईतील विधानभवन परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांची विवंचना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध विदर्भाची आकडेवारी राज्यकर्त्यांच्या डोळय़ात अंजन घालणारी आहे. गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. या काळात एकटय़ा अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटाच्या मालिकेत विदर्भातील शेतकरी सापडले आहेत. वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी हताश झाले असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर...

अखेर १८५७ नंतर वऱ्हाडत गुरे आयात करावी लागली -कापूसकोंड्याची गोष्ट

Image
१८५७ च्या युद्धात उत्तरप्रदेश भागात वऱ्हाडतील ताकदवान व काटक अशा जातीचे बैल नेलं जात असत. ज्यात खामगाव व उमरडा ही महत्वाची जात मानली जायची. मात्र नंतर आलेल्या गुरांच्या रोगांमुळे लाखांच्या संख्येत वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) गुरे मेल्यानंतर बाहेरून गुरे आयात करावी लागली.  कापूसकोंड्याची गोष्ट लेखक डॉ. लक्ष्मण सत्या, अनुवादक नंदा खरे.. या पुस्तकात ब्रिटिश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे.  या पुस्तकाला ऍड. श्रीहरी अणे यांनी प्रस्तावना दिली आहे.  यात पश्चिम विदर्भातील भौगोलिक परिस्थिती, भूजल पातळी, शेती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यासंबंधाने लिखाण केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की वऱ्हाडात सुद्धा मिठाचा उत्पन्न होत असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. तसेच नदी, उपनदी व नदी खोऱ्याच्या संबंधाने व त्यांचे पाण्यासंबंधाने महत्व याबद्दल सुद्धा लिखाण झाले आहे.  लेखकाने विशेष भर दिला आहे तो पशुधन संबंधाने त्यावेळी किती पशुधन होते त्यांची वर्षनिहाय आकडेवारी तर ब्रिटिश शासनाच्या कायद्यामुळे ...

बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो!

Image
बिजप्रक्रियेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा,  पिकाला संरक्षित तर रोगावरील खर्च कमी करतो!  बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवताना कृषी सहाय्यक         यावर्षीच्या खरीप पीक हंगामाला सुरुवात झालेली आहे. तालुक्यात खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणून धान, कापूस, मिरची हे पीक घेतल्या जातो. परंतु दरवर्षी करपा,कडा करपा,मर रोग, काजळी यासारख्या बुरशीजन्य रोगांमुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पन्ना मध्ये घट येते यावर उपाय म्हणून बिजप्रक्रिया करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे पिकाला संरक्षित करता येते, तर  रोगावरील खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे  पिकामध्ये भविष्यात येणाऱ्या रोगापासून आपल्या पिकाला संरक्षीत करण्याकरिता तसेच रोगावरील खर्च कमी करण्याकरिता सर्वांनी बुरशीनाशकांची तसेच जिवाणू खताची बीजप्रक्रिया करूनच बियाणे वापरावे. असे आव्हान सुद्धा कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी”        अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे. तसेच ते ...