Posts

Showing posts with the label बेरोजगारी

पतीला साथ, उदरनिर्वाहाची नवी पहाट

Image
पंचशीला ताईंचा प्रेरणादायी प्रवास अवंती भोयर /  कल्याणी राठोड /  राम वाडीभष्मे नवऱ्याला पायाचा त्रास असल्याने काम येणाऱ्या अडचणींमुळे, नववी पर्यंत शिकलेल्या पंचशीला या तीन वर्षांपासून व्यवसाय स्वतः चालवत आहेत. त्यांचा हा फळांचा रस विक्रीचा व्यवसाय १० वर्षांपासून सुरू आहे. त्यांना तीन मुली व सासू सासरे असून कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होत आहे.  सुरुवातीला पती रवींद्र हा व्यवसाय करायचे. ते सिकलसेल (एस एस) आजार ग्रस्त असून त्यांना आलेल्या कमजोरीमुळे ते पडले होते, तेव्हा  कमरेजवळ असलेला बॉल घसरला त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही. हा व्यवसाय उभे राहून करावा लागतो तसेच यात कंबर व हाताच्या हालचालींना महत्व असल्याने ते रवींद्रला शक्य नव्हते. म्हणून पंचशीला यांनी या व्यवसायात तीन वर्षाआधी हातभार लावणे सुरू केले व आज पूर्ण व्यवसाय त्या सांभाळत आहेत.  दिवसाला सरासरी पाचशे रुपये त्या कमवतात. आता उन्हाळा सुरू झाल्याने कमाई जास्त होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात घरासमोर ठेला लावला होता व ज्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे तिथे घराच्या पत्त्याची प...

राज्यातील रिक्त पदांची खिंडार, कधी भरली जाणार?

Image
राज्यातील रिक्त पदांची खिंडार, कधी भरली जाणार?   अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर तिसऱ्या लाटेची लढाई कशी जिंकली जाणार?       एकीकडे करोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर राज्याचे संरक्षण होणार तरी कसे.? आता अपुऱ्या मनुष्यबळामुळे करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करायचा तरी कसा? असा प्रश्न जनता तसेच कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी करोना संक्रमित झाल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा त्रास व ताण वाढत चालला आहे. यातच ग्रामीण आरोग्याचा डोलारा संभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांचा राज्यात मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. आणि राज्यात सर्वात जास्त रिक्त पदे ही आरोग्य विभागात आहेत. एकूण २०५४४ पदे रिक्त आहेत व गट क व ड च्या सर्वाधिक एकूण १६ हजार ८३८ जागा रिक्त आहेत.            करोना या वैश्विक महाभयंकर बिमारीला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. सध्याच्या घडीला आरोग्य विभागत कंत्राटी स्वरूपात ...