आता वाढतो आहे, बालकांमध्ये टोमॅटो फ्लूचा धोका

८० पेक्षा अधिक बालकांना बाधा, ५ वर्षाखालील मुलं सर्वाधिक

photo : internet

देशात आजकाल लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने पसरत आहे. यातच कोरोनामुळे जग संकटात असताना आता नवीन संकट निर्माण झाले आहे. ते म्हणजेच टोमॅटो फ्लू हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. टोमॅटो फ्लूने चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत ८०  पेक्षा अधिक बालकांना टोमॅटो फ्लूची लागण झाली आहे. संशयित रुग्णामध्ये ५ वर्षाखालील सर्वाधिक मुलं आहेत. या फ्लूने बाधित मुलांच्या शरीरावर फोड तयार होतात जे खूप वेदनादायक असतात. या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात पहिली नोंद

द लॅन्सेट रेस्पिरेटरी वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ६ मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि २६ जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या ८२ वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची लागण झालेल्या २६ बालकांची माहिती देण्यात आली. या मुलांचे वय ५ ते ९ वर्षे दरम्यान आहे. मात्र, एकूण बाधित मुलांमध्ये १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अहवालानुसार, संपूर्ण शरीरात उद्भवणाऱ्या लाल आणि वेदनादायक फोडांवरून या आजाराचे नवा टोमॅटो फ्लूने ठेवण्यात आले आहे. लहान मुलांना टोमॅटो फ्लू होण्याचा धोका जास्त आहे आणि जर त्याचा प्रादुर्भाव रोखला गेला नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर हा संसर्ग प्रौढांमध्येही पसरू शकतो, हा इशारा देण्यात आला. 

ही आहेत लक्षणे

तज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा व्हायरल फ्लू आहे जो मुख्यतः पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. 

  • टोमॅटो फ्लूमुळे त्वचेवर पुरळ उठतात ज्यामुळे त्वचा जळजळ होते.
  • थकवा, मळमळ, उलट्या, अतिसार, ताप, निर्जलीकरण, सांधे सूज, शरीर दुखणे आणि सामान्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे.
  • शरीरावर ही लक्षणे कशामुळे दिसतात हे शोधण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत. टोमॅटो फ्लू या संसर्गाला टोमॅटो फिव्हरही म्हटलं जातं. 
  • या संसर्गामध्ये लहान मुलांना ताप येतो. टोमॅटो फ्लूला, टोमॅटो ताप असेही म्हणतात. यामध्ये लहान मुलांच्या तापाचं निदान होत नाही. टोमॅटो फिव्हर हा व्हायरल फिव्हर आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यूचा प्रकार आहे यावर अजूनही चर्चा सुरू आहे. 
  • यामध्ये संक्रमित मुलाला पुरळ येणं, त्वचेची जळजळ आणि निर्जलीकरण होते. यामुळे शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात. या फोडांचा रंग सामान्यतः लाल असतो आणि म्हणून त्याला टोमॅटो फ्लू किंवा टोमॅटो ताप म्हणतात.

संक्रमण होण्याची कारणे कोणती?

या रोगाची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. आरोग्य अधिकारी अजूनही टोमॅटो तापाच्या कारणांचा शोध घेत आहेत. अहवालानुसार, भारतात फक्त कोल्लमच्या काही भागांमध्ये टोमॅटो फ्लू दिसून आला आहे. पण यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय काय?

या नव्या रोगामुळे पालकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संक्रमित मुलांना भरपूर शुद्ध पाणी पिऊन हायड्रेटेड ठेवावं. फोड किंवा पुरळं ओरबाडू नयेत आणि योग्य स्वच्छता राखली पाहिजे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळावा. तापाचे दीर्घकाळ टिकणारे परिणाम टाळण्यासाठी रुग्णांनी योग्य विश्रांती घ्यावी.

टोमॅटो फ्लू कसा पसरतो?

  •  संक्रमित मुलाच्या संपर्कात येणे.
  • संक्रमित वस्तूच्या संपर्कात येणे.

  • जर मुलाने संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर तोंडात हात घातला.
संसर्ग झाल्यास काळजी घ्यावी?

  • सेल्फ-लिमिटिंग (स्वत: ला मर्यादित करणारा) फ्लू आहे.
  • वेळीच काळजी घेतल्यास लक्षणे नियंत्रित करता येतात. यासाठी बाळाला हायड्रेटेड ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. 
  • याशिवाय बाधित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्यावे, मुलांना फोड किंवा पुरळ येण्यापासून बचाव करावा. 
  • घर आणि मुलांभोवती स्वच्छता ठेवा. बाळांना गरम पाण्याने आंघोळ घाला. 
  • ५ ते ६ दिवस स्वतःला विलग ठेवावे. जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
  • आपल्या आजू-बाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. संसर्ग झालेल्या मुलांसोबत इतरांना खेळू न देणे. एकमेकांच्या खेळण्या वापरू नये.
  • फोडांना हात लावू नये. चुकून स्पर्श केल्यास तत्काळ हात धुवून टाकावेत.
  • संसर्ग झालेल्या मुलाचे कपडे, भांडी वेगळी ठेवावी.
  • पुरेसा आराम केल्यास लवकर जखमा भरून निघतात.

संसर्ग झाला हे कसे कळेल? 

  •  रेस्पिरेटरी सँपल्सद्वारे या आजाराचा संसर्ग कळून येतो. 
  • आजाराची लक्षणे जाणवल्यास ४८ तासांच्या आतच श्वसनाचे नमूने देता येतील. 

  • फेसल सँपल्स अर्थात मल नमून्यांद्वारेही या आजाराची तपासणी होते. पण हे सँपल्सदेखील ४८ तासांच्या आतच घेणे आवश्यक आहे.
उपचार इतर व्हायरल इन्फेक्शन सार

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, टोमॅटो फ्लूचा उपचार इतर व्हायरल इन्फेक्शन सारखाच आहे.आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असेही सुचवले आहे की घशाचे किंवा स्टूलचे नमुने रोग उत्पादक विषाणू वेगळे करण्यासाठी चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाऊ शकतात, जे प्रयोगशाळेचे परिणाम प्राप्त करण्यासाठी २ ते ४ वर्षे लागू शकतात. काही आठवडे लागू शकतात. मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले की टोमॅटो फ्लूचा विषाणू कोव्हिड१९, मंकीपॉक्स, डेंग्यू किंवा चिकनगुनियाशी अजिबात संबंधित नाही.

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?

मेळघाटात घडत आहेत एकलव्य