नरेंद्र अच्युत दाभोलकर

IMG-20180820-WA0000
मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते
स्मृतिदिन – २०, आॅगस्ट इ.स. २०१३
नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ – ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

जीवन

नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.
शिक्षण
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
सामाजिक कार्य
बाबा आढाव यांच्या एक गाव – एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.
साहित्य
अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम – राजहंस प्रकाशन
अंधश्रद्धा विनाशाय – राजहंस प्रकाशन
ऐसे कैसे झाले भोंदू – मनोविकास प्रकाशन
ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक – लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
झपाटले ते जाणतेपण – संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
ठरलं… डोळस व्हायचंय – मनोविकास प्रकाशन
तिमिरातुनी तेजाकडे – राजहंस प्रकाशन
दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.
प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे – डी.व्ही.डी, निर्माते – मॅग्नम ओपस कंपनी.
प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) – राजहंस प्रकाशन
भ्रम आणि निरास – राजहंस प्रकाशन
मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)
विचार तर कराल? – राजहंस प्रकाशन
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी – दिलीपराज प्रकाशन
श्रद्धा-अंधश्रद्धा – राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)
पुरस्कार
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.
समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब
दादासाहेब साखवळकर पुरस्कार
शिवछत्रपती पुरस्कार – कबड्डी
शिवछत्रपती युवा पुरस्कार – कबड्डी
पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)
दाभोलकरांच्या नावाचे पुरस्कार
अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.
##Who Killed Dabholkar??##
##Javab Do…!!!##

विवेकाचा आवाज बुलंद करा..!!

====================
शिवराय,शाहू,फुले,आंबेडकर
आम्ही सारे दाभोलकर
उठा युवकांनो जागे व्हा
पाठी आहे नरेंद्र बा
अघोरी कृत्यांवर होवू दया मारा
विवेकाचा आवाज बुलंद करा
आस धरा तुम्ही,आस धरा
सन्मार्गाचा ध्यास धरा
जाती पाती सर्व नष्ट करा
विवेकाचा आवाज बुलंद करा
अंधश्रद्धेला न देता थारा
विज्ञानाचा वाहू दया वारा
परिवर्तनाचे नवरंग भरा
विवेकाचा आवाज बुलंद करा
दारू नको दूध प्या
व्यसनाधिनतेला खो दया
खुलु दया सुदृढ़तेच्या शिरपेचात तुरा
विवेकाचा आवाज बुलंद करा
स्त्री-पुरुष समानतेचा एकच नारा
संविधानाचा  प्रभाव सारा
वाहिल सर्वत्र प्रेमाचा झरा
विवेकाचा आवाज बुलंद करा
घात-पात ना आमुचा वारसा
सहिष्णुता-शांतिचा सर्वोच्च आरसा
जात-पंचायतीचा होईल पोबारा
विवेकाचा आवाज बुलंद करा
पुरोगामींचा खूनी हिंसेने सजला
बदला नको,त्यांचा विचार बदला
घेवून पुरोगामी विचारांचा सहारा
विवेकाचा आवाज बुलंद करा…!
##Who Killed Dabholkar..??##
##Javab Do…!!!##
©विक्रम मालन आप्पासो शिंदे
7743884307
(मु/पो-वेळू,पाणी फाउंडेशन सातारा)
कविता आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा.

टीप:- मित्रानो सादर लेख हा दिनविशेष आणि विज्ञान ह्या फेसबुक पेज वरून घेण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?