अखेर १८५७ नंतर वऱ्हाडत गुरे आयात करावी लागली -कापूसकोंड्याची गोष्ट

१८५७ च्या युद्धात उत्तरप्रदेश भागात वऱ्हाडतील ताकदवान व काटक अशा जातीचे बैल नेलं जात असत. ज्यात खामगाव व उमरडा ही महत्वाची जात मानली जायची. मात्र नंतर आलेल्या गुरांच्या रोगांमुळे लाखांच्या संख्येत वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) गुरे मेल्यानंतर बाहेरून गुरे आयात करावी लागली. कापूसकोंड्याची गोष्ट लेखक डॉ. लक्ष्मण सत्या, अनुवादक नंदा खरे.. या पुस्तकात ब्रिटिश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे. या पुस्तकाला ऍड. श्रीहरी अणे यांनी प्रस्तावना दिली आहे. यात पश्चिम विदर्भातील भौगोलिक परिस्थिती, भूजल पातळी, शेती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यासंबंधाने लिखाण केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की वऱ्हाडात सुद्धा मिठाचा उत्पन्न होत असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. तसेच नदी, उपनदी व नदी खोऱ्याच्या संबंधाने व त्यांचे पाण्यासंबंधाने महत्व याबद्दल सुद्धा लिखाण झाले आहे. लेखकाने विशेष भर दिला आहे तो पशुधन संबंधाने त्यावेळी किती पशुधन होते त्यांची वर्षनिहाय आकडेवारी तर ब्रिटिश शासनाच्या कायद्यामुळे ...