अत्तरच्या सुगंधापेक्षाही, परिश्रमाच्या घामाचा सुगंध हा मनमोहक असतो !

एम्पावर फांउडेशन तर्फे निराधार, विधवांना अन्न धान्य व किराणा किटचे वाटप

ढोलमरा झोपडपट्टी येथील गरजूंना रेशन किट वाटप करताना 

       कोविड-१९ आणि लॉकडाउनमुळे कित्येक लोकांचे रोजगार हिरावुन गेले, आणि आलेल्या आजारामुळे कित्येक घरांना या काळात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन एम्पावर फांउडेशन या संस्थेच्या सहयोगाने ढोलमरा येथील झोपडपट्टी व आष्टी या गावातील गरजु कुटुंबांना काही दिवसांकरीता सहयोग म्हणुन रेशन किट चे वितरण करण्यात आले.
    झोपडपट्टीतील रहीवासी मागिल कित्येक वर्षापासुन घोटमुंढरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये राहत असुन त्याचाकडे मालकीचे कुठल्याही प्रकारचे उत्पादनाचे साधन नसल्यामुळे आणि कोविड १९ च्या काळात रोजगारावर आणि आरोग्यावर परिणाम पडल्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे.
    या ठिकाणातील लोक मजुरीवर अवलंबून आहेत. महिलांची मुख्य उपजीविका शेती मजुरी आणि बांधकाम कामावर असते तर पुरुष रेल्वे स्थानकांवर काम करणे पसंत करतात. सध्या ही सर्व कामे बंद पडल्यामुळे त्यांचे उत्पन्न बंद झालेले आहे त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. म्हणून अश्या परिस्थितीचा आढावा घेत एम्पावर फांउडेशन द्वारे रेशन किट चे वितरण करण्यात आले. रेशन किट वितरण कार्यक्रम एम्पावर फांडडेशनचे संस्थापक सदस्य श्रीकृष्णा मते यांच्या समन्वयातुन घडले.
    

  
    यावेळी समाजप्रबोधनकार शेखर घाटोळे, नरेंद्र चुनोडे, इमरान शेख, अमोल घरडे, मनीष, राजन भोयर, अक्षय आकरे, शुभम चामट, राम वाडीभस्मे, अतुल सपाटे आदी युवक ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्न धान्य व किराणा किट मध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, चन्ना दाळ, तूर दाळ, तिखट व हळद पॉकीट, सोयाबीन तेल, मीठ, आंघोळीची व कपडे धुण्याची साबण इत्यादि साहित्य देण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?