परीक्षा पुन्हा येऊ शकते पण हे सूंदर आयुष्य नाही...


१२वी चा #निकाल

     मित्रांनो हे लेख माझे नसून माझे फेसबुक मित्र श्री. अनिकेत वाघमारे यांचे आहे. मला हा लेख मी फेसबुक वर वाचला व मला आवडला म्हणुन माझ्या ब्लॉग वरती मी शेयर करत आहे. तरी सर्व श्रेय हे मा. श्री अनिकेत वाघमारे यांचे आहे.   

एकदा नक्की वाचा ......🙏🏼🙏🏼🙏🏼 विनंती करतो.
आपल्या निराश व खचलेल्या मित्र-मैत्रीनींना आधार द्या त्यांची समजूत काढा.....
#परीक्षा पुन्हा येऊ शकते पण हे सूंदर आयुष्य नाही........
काही विद्यार्थींना अपयश ही आले असेल ,पण अश्या वेळी खचुन जाऊ नका ,ही काही आयुष्याची शेवटची परीक्षा नाही.कोणत्याही नैराष्याला बळी पडु नका
पण न संपनारी वीकृत कृती ती म्हणजे नैराश्य होऊन आत्महत्या करने.....
मित्रांनो अस म्हणतात अपेक्षा आणी प्रगती हे मनुष्याच आयुष्य घडवत पण कधी कधी वाटत खरच आत्महत्या करणे म्हणजे इतके सोप आहे की काय....?
म्हणतात हजारो योनी नंतर मनुष्य रूपात आपन जन्म घेतो पण आपन ते सहज कस काय संपवतो.....!
खरच इतके सोपे असत का मरण..........?
आत्महत्या ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे.तरुण वयात मुले पेनकिलर घेऊन झोपतात, त्यांना परिक्षेचा तणावही त्रास देतो लहानपणा पासूनच तणावाच्या वातावरणात मोठं झालेल्या या मुलांना तारुण्यही तेवढंच अवघड वाटत. आज देशात मुलाना नव्वद मिनीटाला एक आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आलीय........
आपन आपल्या आनंदी आयुष्याची अशी राखरांगोळी का करतो....?
शेवटी अपेक्षाच आपल्या आयुष्याचा शेवट आहे की काय.......?
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे पालन पोषन काटेकोरपणे व्हावे असे वाटते. ते मुलांची काळजी घेतात. त्यांना वळण लावतात.पण कित्येकदा वळण लावताना, त्याच्यांवर संस्कार करताना हातून चुका घडण्याची शक्यता असते ते म्हणजे अपेक्षेचे ओझे.त्याचीही जाणीव सर्व पालकाना समजयला हवी.....मी खुप मोठा नाही आणी हो तुमच्यापेक्षा मोठा बुधीजिवी पण नाही कधी कधी असल्या घटना बघून खुप दुःख होत.....
माझ्या मते अस का होत....
स्वत:विषयी त्यांनी विश्वास गमावलेला असतो. त्यांच्या मनात्तून आत्मसन्मानही नाहीसा होतो. जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून त्या व्यक्ती पाहतात. आणि त्यामुळेच जीवनावरची आणि स्वत:वरची त्यांची श्रध्दा नष्ट होण्यास सुरवात होत असते अस मला वाटत.......!
बऱ्याचदा आई वडिलांना असे वाटते की आपण कडक बाप होणे मुलांच्या हिताचे आहे.माझ्या मते तुम्ही कडक असणे आवश्यक आहे, पण तुम्ही अतिकडक असाल तर तुमच्या विषयी तुमच्या मुलांच्या मनात भीती, दहशत निर्माण होते. हे लक्षात घ्या.😓😓😓😓😓
काही वडिलांना मुलाचे लाड केले तर तो बिघडेल अशी भीती वाटते तर काही वडीलांना मुलाची भावनिक गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या बायकोची आहे म्हणजे आईची आणि मुलाच्या योग्य विकासासाठी पैसे मिळवून आणणे एवढीच आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटते. पण तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या भावना तुम्ही व्यक्त केल्या नाही तर भीतीने तो तुमच्याजवळ कधिच येणार नाही.
अस झाल्यास,
तुमची नौकरी व व्यापार करुण कमवीलेला पैसा शून्य च ठरतो...
मुलगा आणि वडील यांच्यातील अंतर वाढण्याचे नेहमीचे कारण म्हणजे वडिलांच्या मुलांबाबत असलेल्या अवास्तव अपेक्षा. मुलांबाबत अपेक्षा बाळगणे योग्य आहे, पण त्याच्या मर्यादा, आवड, त्याची कुवत लक्षात घेऊन या अपेक्षा ठेवणे आवश्यक असते. वडील लोक त्याचा विचार न करता आपल्या मुलाने आपण सांगू त्या क्षेत्रात चमकून दाखवावे असा आग्रह धरतात. मुलाने ती अपेक्षा पूर्ण केली नाही की मग त्याला टोमणे मारणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू होतात.मग एखाद वेळस त्याचे रूपांतर आयुष्याच शेवट पर्यन्त पोहचतो.......
माझी सर्व आई-वडिलांना एक आग्रहा ची विनंती आहे🙏🙏🙏🙏
निव्वळ आपल्या कामात गुंतून राहू नका.माझ्यामते फक्त पैसा हे आयुष्याच धेय्य नसते......
आपल्या कुटूंबासाठी विषेशत: मुलासाठी थोडा वेळ द्या. त्याच्या अभ्यासाची, त्याच्या इतर छंदांची आस्थेनं चौकशी करा. तुमच्याबद्दल त्याच्या मनात मित्रत्वाची भावना येईल, असं तुमचं वर्तन असायला हवं.
मुलांच्या भल्यासाठी त्यांना शिस्त लावणे आवश्यक असतेच. पण शिस्तीचा बाऊ करणे मुलाच्या हिताचे नाही.
मुलाची चूक झाल्यानंतर त्याला रागावणे हे जसे तुम्ही तुमचे कर्तव्य समजता तसेच त्याने चांगले काम केले तर त्याचे त्याबद्दल कौतुक करण्याची तत्परता दाखवा.
लाखो रूपये खर्च करने व अपेक्षे प्रमाणे न झाल्यास आयुष्याचा शेवट करने....अस म्हणतात की काळ सर्व करुण घेतो पण माझ्यामते तो स्वतःआपण आणत असतो, आपन स्वतःचे करता धरता असतो.....तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार
एक विंनती करतो ......🙏🏼 🙏🏻 🙏🏼
माझ्या भाऊ-बहिनींनो एकदा तरी विचार करा आपल्या आई-वडिलांन बद्द्ल .. विचार करा आपल्या परिवारा बद्दल.........आयुष्याचा शेवट करने हा उपाय नाही.......
परिक्षेचा निकालच तुमच खरच आयुष्य घडवत अशी तुमची समज असेल तर ती तुमची खुप मोठी चूक आहे मित्रांनो.....
आयुष्याचा शेवट करने,आत्महत्या करने हा उपाय नाही...😢😢😢
आपल्या निराश,खचलेल्या मित्र-मैत्रीनींना आधार द्या त्यांची समजूत काढा उद्या तुमच्यावर ही वेळ येऊ शकते...
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लेख मनापासून आवडल्यास खुप खुप शेयर करा.....🙏🏼🙏🏼🙏🏼
- अनिकेत वाघमारे ( एक रचनाकार )   
टीप :-  मित्रांनो जर तुम्हाला पण हा लेख आवडला तर तुमच्या मित्र मैत्रीण नातेवाईक याना पण नक्की शेयर करा, पण लेख मध्ये 
           कोणत्याही प्रकारचे खोडतोड न करता. 
धन्यवाद ... 
आपला नम्र 

Comments

Popular posts from this blog

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?

सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर