विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?
विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय? केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ योजनेबाबत २४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक प्रसृत केले आहे. Written by दत्ता जाधव August 29, 2022 1:33:03 am Click to share on Twitter (Opens in new window) Click to share on Facebook (Opens in new window) Click to share on WhatsApp (Opens in new window) (संग्रहित छायाचित्र) दत्ता जाधव केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ धोरण देशात लागू केले आहे. या धोरणांनुसार पंतप्रधान भारतीय जन खत योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. या धोरणावर देशभरातून टीकेचा सूर उमटू लागला आहे त्याबाबत. काय आहे ‘ एक देश एक खत ’ योजना ? केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ योजनेबाबत २४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक प्रसृत केले आहे. त्यानुसार देशात २ ऑक्टोबर २०२२ पासून म्हणजे गांधी जयंतीपासून देशात विकली जाणारी सर्व अनुदानित रासायनिक खते ‘एक देश एक खत’ या योजनेअंतर्गत विकली जाणार आहेत. सर्व खत विक्रेत्या कंपन्यांना एकसारखेच वेष्टन आणि वेष्टनावरील मजकूर छापावा लागणार आहे. खताच्या वेष्टनावरील ७५ टक्के भागावर